PM Surya Ghar Yojana | प्रधानमंत्री सूर्य घर योजना | आता मिळणार 300 Unit मोफत वीज | योजनेची संपूर्ण माहिती बघा | Muft Bijli Yojana

PM Surya Ghar Yojana : भारत सरकार द्वारे नेहमीच विविध प्रकारच्या योजना प्रसिद्ध करण्यात येत असतात. भारत सरकार आपल्या देशातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारे या योजनांचा लाभ देण्याच्या प्रयत्नात असते, आता भारत सरकार द्वारे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना या योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 22 जानेवारी 2024 रोजी घोषणा करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Join Now

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना मध्ये गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील लाईटची समस्या व महिन्याला येणारी बिल लक्षात घेऊन हि योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 1 कोटी घरांवर सोलर पॅनल लावण्याचे लक्ष हे प्रथम टप्प्यामध्ये निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेचे उद्दिष्ट हे ग्रीन एनर्जी चा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरणाला साथ देणे व मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम बजेट मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

PM Surya Ghar Yojana उद्दिष्टय

PM Surya Ghar Yojana या योजनेच्या अंतर्गत देशातील 1 कोटी घरांना महिन्याला 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. यामध्ये 1 कोटी घरांची वार्षिक 15000 कोटी रुपयांची बचत होणार आहे व वापरातून उरलेले वीज ही वीज वितरण कंपनीला विकून आर्थिक लाभ होणार आहे. या योजनेमध्ये आपण Electric वाहने वापरत आसल तर त्याच्या चार्जिंगचा खर्चही आपल्याला येणार नाही व अशा प्रकारे इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. यासोबत सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नवीन रोजगार निर्माण होऊन युवांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

योजनेचे नाव प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना 
योजनेचे लाभार्थी भारतीय नागरिक 
उद्दिष्ट्य मोफत वीज पुरवठा करणे 
लाभ प्रत्येक घराला ३०० युनिट मोफत वीज 

सोलर पॅनल लावण्यासाठी ७५००० रुपया पर्यंत अनुदान 

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन अर्ज 
अधिकृत संकेतस्थळ pmsuryaghar.gov.in

 

या योजनेविषयी माहिती देणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना फायदे || PM Surya Ghar Yojana Advantages

ही योजना केवळ घरांना मोफत वीज पुरवण्यात हे उद्दिष्ट समोर ठेवून बनवले नसून या योजनेची आणखी उद्दिष्ट म्हणजे जास्तीत जास्त नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून पर्यावरण पूरक विज तयार करणे. या योजनेचा फायदा हा भारत सरकारने होणार असून त्यांच्या तिजोरीवर लाईट निर्माण करण्यासाठी लागणारा खर्च कमी होणार आहे

  • या योजनेअंतर्गत 1 कोटी घरांना लाभ मिळणार आहे
  • या योजना अंतर्गत 300 युनिट मोफत विज मिळणार आहे
  • या योजनेमध्ये सोलर पॅनल खरेदीसाठी सरकारद्वारे 60% सबसिडी मिळणार आहे
  • या योजनेमध्ये उर्वरित रक्कम भरण्यासाठी बँका द्वारे कर्ज देखील उपलब्ध होणार आहे
  • या योजनेच्या लाभासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन सरकार द्वारे केले जाणार आहे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हफ्ता येथे चेक करा

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना पात्रता | PM Surya Ghar yojna Eligibility

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी खालील काही पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदाराचे किमान वय हे 18 वर्षे पूर्ण असावे.
  • या योजनेमध्ये गरीब व मध्यवर्गीय कुटुंबांना प्राधान्य आहे. यामध्ये तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असल्यास विशेष प्राधान्य मिळेल.
  • अर्जदाराचे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न असावे.
  • अर्जदाराकडे सोलर पॅनल बसवण्यासाठी घरावरती आवश्यक मोकळी जागा असावी.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजनेसाठी आवश्यक दस्तावेज | PM Surya Ghar Yojana Required Document

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • लाईट बिल
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराची शपथपत्र
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • घरावरील उपलब्ध जागेचा पुरावा 

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत बिजली योजना अर्ज प्रक्रिया | PM Surya Ghar Yojana Application Process 

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. यासाठी अर्ज करणे सुरू करण्या अगोदर सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे तयार ठेवा.

  • सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या  — pmsuryaghar.gov.in
  • सुरुवातीला तुम्हाला Apply for Roof Top Solar हे ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा
PM Surya Ghar Yojana
नवीन रजिस्ट्रेशन येथे करा
  • यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल
  • यासाठी आवश्यक असलेले सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा
PM Surya Ghar Yojana
नवीन रजिस्ट्रेशन येथे करा
  • यानंतर सर्व स्टेप्स या अधिकृत वेबसाईटवर दिलेला आहे त्यानुसार आपला अर्ज पूर्णपणे भरा व सबमिट करा
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची PDF कॉपी हे आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये सेव्ह करून ठेवा
  • यानंतर तुम्हाला निवड झालेल्या यादी काही दिवसानंतर याच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होईल ती वेळोवेळी चेक करत रहा

 

तर मित्रांनो आर्टिकल मध्ये  दिलेली PM Surya Ghar योजना बद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण आर्टिकल साठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा. तुम्ही आम्हाला सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम युट्युब व फेसबुकवरही फॉलो करू शकतो त्यासाठी खाली लिंक दिली आहे.  आशाच आणखी माहितीसाठी येथे क्लिक करा.

Instagram IDclick here
Youtube IDclick here
Facebook Profileclick here

 

 

 

1 thought on “PM Surya Ghar Yojana | प्रधानमंत्री सूर्य घर योजना | आता मिळणार 300 Unit मोफत वीज | योजनेची संपूर्ण माहिती बघा | Muft Bijli Yojana”

Leave a comment